विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यकर्ता कक्षाचे नामकरण

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी कार्यकारी विश्वस्त व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त समितीच्या आपटे वसतिगृहातील कार्यकर्ता कक्षाला त्यांचे नाव देण्यात आले. निर्मलाताई पुरंदरे यांच्या कन्या माधुरी पुरंदरे, पुत्र अमृत पुरंदरे, वनस्थळी संस्थेच्या सचिव भारती भिडे, कोषाध्यक्ष सुषमा साठे, संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, संजय अमृते, तुषार रंजनकर, रत्नाकर मते उपस्थित होते. अमृत पुरंदरे म्हणाले, की समिती हे आईचे पहिले प्रेम होते. तिला सामाजिक कार्याची ओढ होती. ती ओढ आम्हालाही खूप काही शिकवणारी होती. त्यातूनच नकळत आमच्यावर सामाजिक कार्याचे संस्कार झाले.

ग्रामीण भागातील महिला आणि मुलांसाठी काम करत निर्मलाताई पुरंदरे यांनी त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले. केवळ आर्थिक देणगी देऊन नाही, तर समाजाने सामाजिक कामात सहभाग द्यावा, यासाठी त्या आग्रही असायच्या. त्या समाज परिवर्तनाचा प्रेरणास्रोत होत्या, अशा भावना व्यक्त करीत निर्मलाताई पुरंदरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

5 thoughts on “निर्मलाताई पुरंदरे समाज परिवर्तनाचा प्रेरणास्रोत

  1. निर्मलाताईंचा सहवास मला विद्यार्थी दशेपासून मिळाला परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्या बरोबर समितीत कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केल्यावर मला त्यांच्या मधील एक आदर्श कार्यकर्ता, एक भावनाप्रधान आई, जेष्ठ समाजसेविका, तळागाळातील विद्यार्थ्यांप्रती व महिलांप्रती असलेली त्यांची असलेली तळमळ, समितीची कार्यकारी विश्वस्त म्हणून कणखरपणे निर्णय प्रक्रिया राबवणारी प्रमुख अशी अनेकरूपाने ती समृद्ध होत गेली, समितीच्या कामाला मोठी गती त्यांच्या कारकिर्दीमध्ये मिळाली व समितीची निवासी विद्यार्थी संख्या त्यांच्याच काळात ३५० वरून ६५० वर पोहचली त्यांच्या काळामध्ये समितीचे कारखानीस वसतिगृह उभे राहिले समिती व्यवस्थापनाने कार्यकर्ता कक्षाला नाव देऊन त्यांची स्मृती कायमस्वरूपी जपण्याचा व पुढील पिढ्यांसाठी त्यांचे कार्य पथदर्शी करण्याचा निर्णय केला ही खूप स्तुत्य बाब आहे

  2. श्री उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन म्हणतो आहे:

    *”… एक भावस्पर्शी पुण्यस्मरण!!*
    ¶स्वर्गीय निर्मलाताई पुरंदरे ( माजगावकर ) या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या कायम विश्वस्त आणि कार्यकारी विश्वस्त होत्या. विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत तसेच सर्वांगीण विकासात त्यांचे जवळपास चार दशके मोठे योगदान होते. त्या ‘वनस्थळी’ संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या. ‘वनस्थळी’ ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी खेड्यापाड्यातील महिला सक्षमीकरणात महत्वपूर्ण काम केले. त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुमारे अडीचशे बालवाडी शाळा निर्माण करण्याबरोबरच त्यांनी शिक्षकही घडवले. ग्रामीण भागातील मुलांसाठी किशोर छंद वर्ग, फिरते वाचनालय, महिलांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर, व्यवसाय प्रशिक्षण, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कायम झटत राहिल्या. फ्रान्स मित्र मंडळाच्या माध्यमातून निर्मलाताई पुरंदरे यांनी मोलाचे योगदान दिले होते.
    ¶सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आदिशक्ती पुरस्कार आणि सावित्रीबाई पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. फुलगाव येथे निराश्रित विद्यार्थ्यांसाठी त्यांनी बाल सदनाची स्थापना केली होती…डॉ. अच्युतराव आपटे सरांच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी त्या आयुष्यभर कार्यरत राहिल्या. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आम्हा विद्यार्थ्यांना त्यांनी मातृप्रेम दिले. त्यांच्या सहवासात आमचा समितीमधील कालखंड समृध्द झाला. आम्हाला त्यांच्यामुळे सतत नवीन ऊर्जा, नवीन उमेद, नवीन उन्मेष आणि परिपूर्ण जीवनाचा खरा अर्थ आणि आशय उमगला.
    ¶त्यांचा स्मरणार्थ कार्यकर्ता कक्षाला त्यांचे नाव देण्याचा जो निर्णय विद्यार्थी सहाय्यक समितीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे, तो निश्चितच स्तुत्य असुन त्या माध्यमातून एक समर्पित, निस्पृह, निरपेक्ष भावनेतून कार्य करणारा हाडाचा कार्यकर्ता कसा असावा, याचे प्रेरणादायी दर्शन भावी पिढीला सातत्याने होत राहील…
    ……..स्वर्गीय निर्मलाताई पुरंदरे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन 💐
    ¶श्री उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग व परिवार मो. 7276772400

  3. माननीय निर्मलाताई पुरंदरे यांच्या कार्याचा ठसा सर्व खेड्यामधे बालवाडी मुळे पसरला आहे.त्याच्या कामाचा मोटो घरामधील एका मुलीला शिकवले तर ती घरातल्या सर्वांना साक्षर करु शकते. अशा त्यांच्यामुळे कितीतरी मुली बायका शिक्षित
    झाल्या आहेत . फार मोठे काम आहे.

    ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत