विद्यार्थी साहाय्यक समितीकडे, ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तनात घडविणारी संस्था आणि युवा परिवर्तनाचे केंद्र म्हणून पाहिले जाते. समिती ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कलम ५० ए (३) अंतर्गत नोंदणीकृत (क्र. ई-२१९, पुणे) संस्था असून संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर आहे.