खोली : एका खोलीत तीन किंवा चार विद्यार्थ्यांची खोलीच्या आकारानुसार व्यवस्था केली जाते. खोलीत प्रत्येकाला कॉट, गादी, टेबल, खुर्ची, कपाट, पंखा आदी व्यवस्था पुरवली जाते.

भोजनालय : समितीत प्रवेश झाल्यावर विद्यार्थ्याला येथील भोजन घेणेच अनिवार्य असते. रोज सकाळी आणि रात्री अशा दोन वेळेला जेवणाची व्यवस्था आहे. या वयोगटाचा विचार करून तज्ज्ञाच्या सल्ल्याने आहाराचे नियोजन असते. विद्यार्थ्यांनी आपले ताट आणि पाणी पिण्याचे भांडे स्वतः स्वच्छ करायचे असते. भोजनालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असते.

ग्रंथालय : वसतिगृहनिहाय स्वतंत्र ग्रंथालयाची सुविधा आहे. क्रमिक आणि अवांतर पुस्तके उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करावे यासाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थी अवलोकनमध्ये त्याची नोंद असते.

संगणक : विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सुसज्ज संगणक लॅब आहेत. अभ्यासक्रमाशी निगडीत गोष्टींसाठी विद्यार्थी या लॅबचा उपयोग करू शकतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याविषयीचे काही अभ्यासक्रमही शिकवले जातात.

आरोग्य केंद्र : प्रवेश झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी केली जाते. प्राथमिक उपचाराकरिता डॉक्टरांची सेवा आहे. रुग्णालयात दाखल करायची वेळ आल्यास पालकांशी संपर्काचा प्रयत्न केला जातो. त्या खर्चाची जबाबदारी पालकांची असते.

क्रीडा : विद्यार्थ्यांना संस्थांतर्गत आणि क्रीडांगणावर खेळण्यासाठी क्रीडासाहित्य उपलब्ध करून दिले जाते. विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवून शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीबरोबरच स्पर्धेत सहभागी होऊन हार-जीतीचे प्रशिक्षण नकळत मिळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत