संदीप आसलेकर

समिती सारखे संस्था अस्तित्वात आहे याची मला कल्पना नव्हती होस्टेल सगळीकडेच असतात पण होस्टेल हे विकास केंद्र होऊ शकते आणि त्यातून मुलांच्या भवितव्याचे शिल्प तयार होऊ शकते, असे काही असेल मी हे पहिल्यांदाच पाहिले. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. समितीच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

विवेक औटी

समितीतून मी नुकताच बाहेर पडलो. संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना इथला चार वर्षाचा निवास अतिशय अविस्मरणीय होता. समितीमधील प्रत्येक गोष्ट खूप काही शिकवणारी आहे. चार तास काम, योगा, कमवा – शिका, पाल्य पालक योजना या सर्व उपक्रमांतून खूप काही शिकायला मिळालं . खरं तर गावाकडून आलेला एक साधारण विद्यार्थी ते जबाबदार, स्वावलंबी, नागरिक हा प्रवास समितीमुळे सुखकर झाला. महाविद्यालयाने ४ वर्षात software चा code decode करायला शिकवलं. पण समितीने आयुष्याचा code decode करायला शिकवला.

लोकसभेच्या माजी अध्यक्ष

पद्मभूषण सुमित्रा महाजन

एका अत्यंत सुंदर संस्थेचा परिचय झाला. संस्थेत काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच संस्थेची ओळख असते. येथील सर्वजण अतिशय निरलसपणे काम करत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतून जे मिळते ते नक्कीच जीवनशिक्षण आहे. मला काय त्याचे… असा समाजात विचार असताना समितीचे विद्यार्थी मलाच त्याचे असा विचार करताना दिसतात. या मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केल्यामुळे माजी विद्यार्थी परत संस्थेकडे येत आहेत, हे कौतुकास्पद आहे.