एका अत्यंत सुंदर संस्थेचा परिचय झाला. संस्थेत काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच संस्थेची ओळख असते. येथील सर्वजण अतिशय निरलसपणे काम करत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतून जे मिळते ते नक्कीच जीवनशिक्षण आहे. मला काय त्याचे… असा समाजात विचार असताना समितीचे विद्यार्थी मलाच त्याचे असा विचार करताना दिसतात. या मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केल्यामुळे माजी विद्यार्थी परत संस्थेकडे येत आहेत, हे कौतुकास्पद आहे.