पुणे, ता. २७ : “चांगल्या कामासाठी निधी संकलन हा सामाजिक अभिसरणाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी मदत मागायला कधीही लाजू नका. निर्मळ मनाने मागितलेली मदत सदैव हाताने देणारे दानशूर समाजात आहेत”, असे मत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. विद्यार्थी साहाय्यक समितीमधील १३०० विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून संकलित केलेला निधी संस्थेकडे सुपूर्त […]
