सन्माननीय साहाय्यदाते व हितचिंतक,
हजारो ग्रामीण युवकांच्या आयुष्यात शिक्षणसंधीतून परिवर्तन साधण्याचे काम समिती अर्धशतकाहून अधिक काळ करत आहे. समितीत येणारा विद्यार्थी हा अल्प उत्पन्न गटातीलच असतो. परंतु तो नुसताच गरजू नसतो तर तो होतकरूही असतो. अशा विद्यार्थ्यांना केवळ अल्प दरात निवास, भोजन नाही, तर त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी येथे विविध उपक्रम राबवले जातात.
मुळात युवकांना काही चांगले करायचे असते. परंतु त्यासाठी त्यांना तसे वातावरण देणे, सामाजिक समरसतेचा, सकारात्मकतेचा विचार त्यांच्यापुढे ठेवणे, त्यांची ऊर्जा विधायकतेकडे वळवणे, त्यांचे स्फुल्लिंग चेतवणे गरजेचे असते. एका नवनिर्माण करणाऱ्या पिढीची त्यातून निर्मिती होते, यावर समितीचा विश्वास आहे. आजवर आम्ही ते अनुभवत आहोत. अर्थात हे सारे शक्य होते ते आपल्यासारख्या दानशूरांमुळे, हितचिंतकांमुळे. समितीचा व्यवहार अतिशय पारदर्शी असल्यामुळे पिढ्यानपिढ्या देणगी देणाऱ्यांच्या बळावरच हा जगन्नाथाचा रथ हाकणे शक्य होते आहे. आपण समितीच्या कार्याची माहिती घ्यावी, एकदा अवश्य भेट द्यावी.
आपल्या परिचितांपर्यंत हे कार्य पोचवावे आणि यथाशक्ती आपलाही सहभाग या कार्यात नोंदवावा, अशी विनंती आहे.
आपला विश्वासू
कार्यकारी विश्वस्त
श्री. तुषार रंजनकर
विद्यार्थी साहाय्यक समितीला आपण खालीलप्रकारे साहाय्य करू शकता
१. अन्ननिधी – समितीत सुमारे १,१०० विद्यार्थी-विद्यार्थिनी निवासासाठी आहेत. त्यांचा एकवेळचा जेवणखर्च १६,००० रु. आहे. आपल्या कुटुंबातील आनंदाच्या आणि स्मृतीप्रसंगी देणगी देऊ शकता. या देणगीचा उल्लेख समितीच्या फलकावर दाखविला जातो.
२. पालकत्व – एका विद्यार्थ्यासाठी (सर्व खर्चांसहित) समितीला वार्षिक ६४,०००/- रु. खर्च येतो. यापैकी विद्यार्थ्याकडून फक्त ३२,०००/- रु. म्हणजे ५० टक्केच फी घेतली जाते. ३२,०००/- रु. ही समितीला तूट येते. ही तूट भरून काढण्यासाठी देणगी दिल्यास त्याला पालक संबोधले जाते. पालकांना दरमहा एक विद्यार्थी भेटतो.
३. बिल्डींग फंड – पुण्यात ३३६ मुलींसाठी नवीन वसतिगृह उभारण्यात आले आहे. यात ११२ खोल्या आहेत. प्रत्येक खोलीला १० लाख रुपये देणगी देऊन देणगीदाराच्या इच्छेप्रमाणे नामफलक लावण्यात येईल
४. सीएसआर –कंपन्यांना आपल्या नफ्यातील काही हिस्सा सामाजिक दायित्व म्हणून खर्च करण्याची शासनाने कायद्यात तरतूद केली आहे. या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये शिक्षण, विद्यार्थिनींचे सक्षमीकरण, ग्रामीण विद्यार्थ्यांचे परिवर्तन असे कार्य समिती करतेच आहे. त्यामुळे ज्या आस्थापनांना सीएसआर लागू होतो ते समितीला या उपक्रमांसाठी देणगी देऊ शकतात.
समितीला मिळणारी देणगी आयकर कायद्याच्या कलम ८० जी नुसार करसवलतीस पात्र आहे.
समितीला देणगी देण्यासाठी बँकेची माहिती
स्थानिक (भारतातील) देणगीदारांसाठी
ICICI Bank : A/C No.000501060326
IFSC : ICIC0000039
Branch : Shivajinagar, Pune
(Please mention Full address and mail ID)