चांगल्या कामासाठी दानशूरांची सदैव हाताने मदत डॉ. सदानंद मोरे यांचे मत ; विद्यार्थ्यांनी संकलित केलेला निधी संस्थेकडे सुपूर्त

पुणे, ता. २७ : “चांगल्या कामासाठी निधी संकलन हा सामाजिक अभिसरणाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी मदत मागायला कधीही लाजू नका. निर्मळ मनाने मागितलेली मदत सदैव हाताने देणारे दानशूर समाजात आहेत”, असे मत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. विद्यार्थी साहाय्यक समितीमधील १३०० विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून संकलित केलेला निधी संस्थेकडे सुपूर्त […]

आपल्या समस्यांवर आपणच उपाय शोधायचे; इतरांसाठी ते फक्त डब्बे!

पुणे : आपल्या समस्या, प्रश्न, अडचणींवर लक्ष केंद्रित करा. त्या सोडवण्यासाठी इतर कुणी येईल अशी अपेक्षा बाळगू नका. प्रत्येकाच्या समस्या या फक्त त्याच्याच असतात. त्याच्यावरच विचार करून स्वतःमधूनच सुटका असते. कुणालाही समस्या सोडवायला फुरसत नसते. प्रत्येकजण आपापल्या समस्यांमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे आपल्या समस्यांवर उपाय शोधायचा असेल, तर आपणच आत्मनिर्भर व्हायला हवे, असे मत अभिनेता, लेखक-दिग्दर्शक […]

अजरामर मराठी गीतांचा सुरेल नजराणा

पुणे, ता. ५ : शब्दांच्याच कळ्यांनी… गेला माझा मोहून… कुठून येते… कोमलस्वरा रामबाई… शुक्रतारा मंदवारा… निज माझ्या नंदाला रे…अशा अजरामर मराठी गीतांचा सुरेल नजराणा पुणेकरांसमोर सादर झाला. अनेक रसिकांच्या मनाचा ठाव घेत ‘शतजन्म शोधताना’ हा देखणा प्रयोग सादर झाला. निमित्त होते, विद्यार्थी सहाय्यक समितीतर्फे देणगीदार, हितचिंतक यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आयोजित सर्व इव्हेंट्स प्रस्तुत ‘शतजन्म शोधताना’ […]