पुणे, ता. २७ : “चांगल्या कामासाठी निधी संकलन हा सामाजिक अभिसरणाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी मदत मागायला कधीही लाजू नका. निर्मळ मनाने मागितलेली मदत सदैव हाताने देणारे दानशूर समाजात आहेत”, असे मत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी साहाय्यक समितीमधील १३०० विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून संकलित केलेला निधी संस्थेकडे सुपूर्त केला. यावेळी समितीच्या विद्यार्थ्यांसह डॉ. सदानंद मोरे, तुकाराम गायकवाड, प्रदीप मांडके, वल्लभ कोल्हेकर आदी उपस्थित होते.

शिवाजीनगर : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून संस्थेसाठी संकलित केलेला निधी समितीकडे सुपूर्त केला. यावेळी समितीच्या विद्यार्थ्यांसह डॉ. सदानंद मोरे, तुकाराम गायकवाड, प्रदीप मांडके, वल्लभ कोल्हेकर आदी उपस्थित होते.

चंद्रकांत कुलकर्णी व मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्गा पवार आदी उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, “डेक्कन कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट, भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था अशा समाज घडवणाऱ्या संस्थांमधून विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्य आहे. या संस्था महाराष्ट्राचे भूषण आहेत. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक संवेदनशीलता रुजवण्याचे काम विद्यार्थी साहाय्यक समिती करते. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.”

रंजनकर म्हणाले, “गेल्या ४० वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. समितीचे काम गावागावात पोहोचावे, तसेच निधी संकलन वाढावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. देणारे हात असंख्य आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे.” यावेळी संकलनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पर्यवेक्षकांचा सन्मान करण्यात आला. वल्लभ कोल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *