Aapte-hostel-slider-26082021
PD-Karkhanis-slider-26082021
Lajpat-Bhavan-slider-26082021
Sumitra-photo--new-name-board-slider-26082021
Modak-Hall-slider-26082021
previous arrow
next arrow
Shadow

विद्यार्थी साहाय्यक समिती

ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारी संस्था आणि युवा परिवर्तनाचे केंद्र म्हणून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कामाकडे पाहिले जाते. समिती ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कलम ५० ए (३) अंतर्गत नोंदणीकृत (क्र. ई-२१९, पुणे) संस्था असून संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवत्तेच्या जोरावर काहीतरी ध्येय ठेवून धडपड करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुण्यात अतिशय माफक दरात राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी या हेतूने ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. अच्युतराव आपटे, स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ फाटक, सुमित्राताई केरकर आदींनी १९५५ मध्ये या कामाला सुरवात केली.

उपक्रम

अल्पदरात निवास व भोजन पुरवणे एवढ्यापुरतेच मर्यादित समितीचे कार्य नाही तर येथील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास हे समितीचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी व्यवस्थापनातून या ग्रामीण युवकांचे सुसंस्कारित आणि आत्मविश्वासपूर्ण पिढीत रुपांतर करण्याचा समितीचा मनोदय आहे.

गटचर्चा, इंग्रजी भाषा वर्ग. इंग्रजी प्रेझेंटेशन, योगासने, क्रीडा (अनिवार्य), सांस्कृतिक कार्यक्रम (पाककला, वादविवाद, वत्कृत्व, कथाकथन आदी स्पर्धांचे आयोजन), विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने, शैक्षणिक सहली, उद्योजकता विकास उपक्रम, विद्यार्थी व्यवस्थापन.

सुविधा

समिती म्हणजे केवळ लॉजिंग बोर्डिंग नाही तर येथे माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर
व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व असते. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर समितीचे काम चालते. एका खोलीत तीन ते चार विद्यार्थ्याची व्यवस्था असते.
प्रत्येकाला स्वतंत्र कॉट, गादी, टेबल, खुर्ची, कपाट मिळते. पंखा, गरम पाणी या सोबतच, संगणक प्रशिक्षण, सुसज्ज ग्रंथालय, आरोग्य केंद्र, खेळासाठी साहित्य आदि सुविधा उपलब्ध केल्या जातात.

विश्वस्त मंडळ: (२०२०-२०२३)

पद्मश्री प्रताप पवार

संस्थेचे ४० वर्षांहून अधिक काळ अध्यक्ष आहेत. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष असून पुण्यातील विविध सामाजिक संस्थांसाठी अनेक वर्षे काम करत आहेत.

श्री. विजय पुसाळकर

इंडो शॉटले प्रा. लि. कंपनीचे अध्यक्ष असून समितीचे कायम विश्वस्त आहेत.

श्री. विजय पुसाळकर

कायम विश्वस्त
डॉ. भाऊसाहेब जाधव

मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. समितीच्या कार्याशी गेली पंधरा वर्षांहून अधिक संलग्न आहेत.

डॉ. भाऊसाहेब जाधव

कायम विश्वस्त
श्री. तुकाराम गायकवाड

संस्थेचे माजी विद्यार्थी असून गायकवाड एंटरप्रायझेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत. गेली तीस वर्षे संस्थेच्या कार्याशी संलग्न आहेत.

श्री.तुकाराम गायकवाड

कार्यकारी विश्वस्त, कार्यकर्ते
श्री संजय अमृते

बँकेतील निवृत्त अधिकारी असून देणगीदार म्हणून समितीशी जोडले गेले. पुढे या कार्यात वेळ द्यायला सुरवात केली. सध्या विश्वस्त असून खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

श्री. संजय अमृते

खजिनदार, कार्यकर्ते
सुनंदा माने

सुनंदा माने

विश्वस्त, सल्लागार
सुप्रियाताई केळवकर

शिक्षण क्षेत्रात मोठे काम असून सध्या समितीत विश्वस्त आहेत. विद्यार्थी विकास केंद्र या उपक्रमासाठी
मोठे योगदान देत आहेत.

सुप्रियाताई केळवकर

विश्वस्त, सल्लागार, कार्यकर्ते
श्री. तुषार रंजनकर

संस्थेचे माजी विद्यार्थी असून अल्फा बाईट कॉम्प्युटर्स संस्थेचे संस्थापक आहेत. तीस वर्षांहून अधिक काळ संस्थेसाठी कार्यरत आहेत.

श्री. तुषार रंजनकर

विश्वस्त, कार्यकर्ते
श्री. तेज निवळीकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे मानद संचालक म्हणून अनेक वर्षांचा अनुभव. समितीच्या प्रशासकीय कामाशी पाच वर्षांपासून संलग्नता.

श्री. तेज निवळीकर

विश्वस्त, सल्लागार
श्री. रत्नाकर मते

संस्थेचे माजी विद्यार्थी असून इंजिनिअर म्हणून विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कामांचा अनुभव आहे. संस्थेच्या विविध प्रकल्पांची जबाबदारी सांभाळत आहेत.

श्री. रत्नाकर मते

विश्वस्त, कार्यकर्ते
श्री. जिभाऊ शेवाळे

संस्थेचे माजी विद्यार्थी असून जनसेवा सहकारी बँकेत अधिकारी आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या संघटनात मोठा सहभाग आहे.

श्री. जिभाऊ शेवाळे

विश्वस्त, कार्यकर्ते
श्री. राजेद्र ततार

संस्थेचे माजी विद्यार्थी असून कौटुंबिक न्यायालयातून समुपदेशक म्हणून निवृत्त झाले आहेत. संस्थेच्या माजी विद्यार्थी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली.

श्री. राजेद्र ततार

विश्वस्त, कार्यकर्ते

समितीचे माजी विद्यार्थी. सकाळ माध्यम समूहात २९ वर्षे कामाचा अनुभव. माजी विद्यार्थी मंडळाचे ६ वर्षे अध्यक्ष.

श्री. चंद्रकांत कुलकर्णी

मुख्य कार्यकारी अधिकारी

विद्यार्थी साहाय्यक समिती

निर्मलाताई पुरंदरे समाज परिवर्तनाचा प्रेरणास्रोत

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यकर्ता कक्षाचे नामकरण विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी कार्यकारी विश्वस्त व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलात
अधिक वाचा
तुम्ही विद्यार्थी साहाय्यक समितीला मदत करू शकता

सुविधा

समिती म्हणजे केवळ लॉजिंग बोर्डिंग नाही तर येथे माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व असते. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर समितीचे काम चालते.

माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतकांच्या मनातलं

  • समितीतून मी नुकताच बाहेर पडलो. संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना इथला चार वर्षाचा निवास अतिशय अविस्मरणीय होता. समितीमधील प्रत्येक गोष्ट खूप काही शिकवणारी आहे. चार तास काम, योगा, कमवा – शिका, पाल्य पालक योजना या सर्व उपक्रमांतून खूप काही शिकायला मिळालं . खरं तर गावाकडून आलेला एक साधारण विद्यार्थी ते जबाबदार, स्वावलंबी, नागरिक हा प्रवास समितीमुळे सुखकर झाला. महाविद्यालयाने ४ वर्षात software चा code decode करायला शिकवलं. पण समितीने आयुष्याचा code decode करायला शिकवला.

    विवेक औटी

    विद्यार्थी
  • एका अत्यंत सुंदर संस्थेचा परिचय झाला. संस्थेत काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच संस्थेची ओळख असते. येथील सर्वजण अतिशय निरलसपणे काम करत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतून जे मिळते ते नक्कीच जीवनशिक्षण आहे. मला काय त्याचे… असा समाजात विचार असताना समितीचे विद्यार्थी मलाच त्याचे असा विचार करताना दिसतात. या मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केल्यामुळे माजी विद्यार्थी परत संस्थेकडे येत आहेत, हे कौतुकास्पद आहे.

    लोकसभेच्या माजी अध्यक्ष

    पद्मभूषण सुमित्रा महाजन

    लोकसभेच्या माजी अध्यक्ष