मित्रांनो,
आपल्या पुण्यातील विद्यार्थी दशेत समिती नसती तर आपले शिक्षण पूर्ण होण्यात अनंत अडचणी आल्या असत्या याची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे. समिती म्हणजे आपले दुसरे घर. आपण सर्व एकमेकांचे मित्र म्हणजे आपला समिती परिवार. ही आपली मोठी ताकद आहे.
तुम्ही जेथेही असाल तेथे उत्तमच काम करत असणार हा आम्हा सर्वांचा विश्वास आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निश्चित समितीत या. नवीन काय सुरू आहे, त्याची माहिती घ्या. आपल्या परिसरातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना समितीपर्यंत पोचवा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत