ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारी संस्था आहे. युवा परिवर्तनाचे केंद्र म्हणून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कामाकडे पाहिले जाते. समिती ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कलम ५० ए (३) अंतर्गत नोंदणीकृत (क्र. ई-२१९, पुणे) संस्था असून संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर आहे.  समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवत्तेच्या जोरावर काहीतरी ध्येय ठेवून धडपड करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुण्यात अतिशय माफक दरात राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी या हेतूने ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. अच्युतराव आपटे, स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ फाटक, सुमित्राताई केरकर आदींनी १९५५ मध्ये या कामाला सुरवात केली. त्यावेळी पाच विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या घरी वाराने जेवणाची सोय करण्यापासून काम सुरू झाले. पुढे विद्यार्थ्यांचा निवासाचा प्रश्न मार्गी लावला. मग विद्यार्थिनींसाठी सोय करण्यात आली. आता समितीची पुण्यात चार वसतिगृहे असून त्यात ७४७ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येथील सुविधांचा लाभ घेत आहेत. समिती म्हणजे केवळ लॉजिंग बोर्डिंग नाही तर येथे माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. समितीत जात, धर्म, पंथ या संकल्पनेला थारा दिला जात नाही. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर समितीचे काम चालते. देणगीदार जरी शहरी भागातले असले तरी प्रवेश फक्त ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनाच दिला जातो.

समिती कार्यकारिणी

विश्वस्त मंडळ: (२०२०-२०२३)
पद्मश्री प्रताप पवार

संस्थेचे ४० वर्षांहून अधिक काळ अध्यक्ष आहेत. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष असून पुण्यातील विविध सामाजिक संस्थांसाठी अनेक वर्षे काम करत आहेत.

श्री. विजय पुसाळकर

इंडो शॉटले प्रा. लि. कंपनीचे अध्यक्ष असून समितीचे कायम विश्वस्त आहेत.

श्री. विजय पुसाळकर

कायम विश्वस्त
डॉ. भाऊसाहेब जाधव

मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. समितीच्या कार्याशी गेली पंधरा वर्षांहून अधिक संलग्न आहेत.

डॉ. भाऊसाहेब जाधव

कायम विश्वस्त
श्री. तुकाराम गायकवाड

संस्थेचे माजी विद्यार्थी असून गायकवाड एंटरप्रायझेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत. गेली तीस वर्षे संस्थेच्या कार्याशी संलग्न आहेत.

श्री.तुकाराम गायकवाड

कार्यकारी विश्वस्त, कार्यकर्ते
श्री संजय अमृते

बँकेतील निवृत्त अधिकारी असून देणगीदार म्हणून समितीशी जोडले गेले. पुढे या कार्यात वेळ द्यायला सुरवात केली. सध्या विश्वस्त असून खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

श्री. संजय अमृते

खजिनदार, कार्यकर्ते
श्री. रमाकांत तांबोळी

समितीचे माजी कर्मचारी असून अतिशय तळमळीने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी प्रयत्न केले. माजी विद्यार्थी मंडळाच्या उभारणीसाठी मोठे योगदान.

श्री. रमाकांत तांबोळी

विश्वस्त, कार्यकर्ते
सुप्रियाताई केळवकर

शिक्षण क्षेत्रात मोठे काम असून सध्या समितीत विश्वस्त आहेत. विद्यार्थी विकास केंद्र या उपक्रमासाठी
मोठे योगदान देत आहेत.

सुप्रियाताई केळवकर

विश्वस्त, सल्लागार, कार्यकर्ते
श्री. तुषार रंजनकर

संस्थेचे माजी विद्यार्थी असून अल्फा बाईट कॉम्प्युटर्स संस्थेचे संस्थापक आहेत. तीस वर्षांहून अधिक काळ संस्थेसाठी कार्यरत आहेत.

श्री. तुषार रंजनकर

विश्वस्त, कार्यकर्ते
श्री. तेज निवळीकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे मानद संचालक म्हणून अनेक वर्षांचा अनुभव. समितीच्या प्रशासकीय कामाशी पाच वर्षांपासून संलग्नता.

श्री. तेज निवळीकर

विश्वस्त, सल्लागार
श्री. रत्नाकर मते

संस्थेचे माजी विद्यार्थी असून इंजिनिअर म्हणून विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कामांचा अनुभव आहे. संस्थेच्या विविध प्रकल्पांची जबाबदारी सांभाळत आहेत.

श्री. रत्नाकर मते

विश्वस्त, कार्यकर्ते
श्री. जिभाऊ शेवाळे

संस्थेचे माजी विद्यार्थी असून जनसेवा सहकारी बँकेत अधिकारी आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या संघटनात मोठा सहभाग आहे.

श्री. जिभाऊ शेवाळे

विश्वस्त, कार्यकर्ते
श्री. राजेद्र ततार

संस्थेचे माजी विद्यार्थी असून कौटुंबिक न्यायालयातून समुपदेशक म्हणून निवृत्त झाले आहेत. संस्थेच्या माजी विद्यार्थी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली.

श्री. राजेद्र ततार

विश्वस्त, कार्यकर्ते

समितीचे माजी विद्यार्थी. सकाळ माध्यम समूहात २९ वर्षे कामाचा अनुभव. माजी विद्यार्थी मंडळाचे ६ वर्षे अध्यक्ष.

श्री. चंद्रकांत कुलकर्णी

मुख्य कार्यकारी अधिकारी
कार्यकर्ता मंडळ